जागतिक परिचारिका दिन मराठी निबंध भाषण माहिती - International Nurses Day in Marathi 2023
नमस्कार मित्रांनो आज आपण ज्यांनी करोना काळामध्ये सर्वात जास्त व मोलाचे योगदान दिले अशा परिचारिका यांचा आज जागतिक आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आहे त्यामुळे या सर्व कोरोना योद्धा ना जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा , या जागतिक परिचारिका दिनानिमित्त आज आपण थोडक्यात माहिती वाचणार आहोत याचा उपयोग आपण मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन यामध्ये नक्कीच करू शकतात असला तर जागतिक परिचारिका दिन याची थोडक्यात माहिती मराठीमध्ये वाचूया.
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन (International Nurses Day in Marathi) हा आपल्या परिचारिकांनी समाजासाठी केलेल्या योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. संपूर्ण जगात 12 मे (12 May) 2023 रोजी "आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन (International Nurses Day)" म्हणून साजरी केला जातो. आजच्या या लेखा मध्ये आपन या बाबत संपूर्ण माहिती अभ्यासणार आहोत -
जागतिक परिचारिका दिन मराठी माहिती - International Nurses Day in Marathi
12 मे हा दिवस फ्लोरेन्स नाईटिंगेल यांची जयंती म्हणून साजरा केला जातो आणि जग भरातील परिचारिकांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, त्यांच्या प्रचंड परिश्रम आणि आरोग्य सेवा सातत्यातील योगदानासाठी त्यांचे स्मरण करण्यासाठी "जागतिक परिचारिका दिन - International Nurses Day" साजरा केला जातो.
गरजेच्या वेळी, ते एखाद्या व्यक्तीला मदत करणारे पहिले असतात. आजारी व्यक्तीची काळजी घेणे, त्यांना आदरयुक्त उपचार हे सर्व कार्ये परिचालक निर्विवाद पणे आणि मोठ्या उत्साहात करतात हे महत्त्वाचे आहे.
ते आरोग्य सेवेच्या वितरणासाठी केंद्र स्थानी आहेत आणि महामारी किंवा साथीच्या काळात त्यांचे त्याग, सेवा भाव, बलिदान खूप मोलाचे मानले जाते आणि म्हणूनच त्यांचे कौतुक केले जाते.
पहिला आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा (First International Nurses Day celebration in Marathi) 2023
1965 मध्ये सर्व प्रथम सार्वजनिक रित्या हा दिन साजरा करण्यात आला. त्या नंतर जानेवारी 1974 मध्ये 12 मे हा दिवस ‘परिचारिका दिन (Nurses Day in Marathi)’ साजरा करण्यासाठी निवडण्यात आला.
परिचारिका दिन चा इतिहास (Nurses Day History in Marathi)
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन
-International Nurses Day या दिनी जगातील सर्वात लोकप्रिय परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा (Florence Nightingale) वाढदिवस आहे.
1820 मध्ये जन्मलेली ही इंग्लिश परिचारिका क्रिमीयन युद्धात ब्रिटिश सहयोगी जखमी सैनिकांना सांभाळण्यासाठी फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचे अमूल्य योगदानासाठी त्या ओळखल्या जातात.
त्या शिवाय, त्या एक सांख्यिकीशास्त्रज्ञ (Statistician), एक समाज सुधारक आणि आधुनिक नर्सिंगच्या प्रमुख स्तंभांच्या संस्थापक देखील होत्या.
फ्लोरेन्स नाइटिंगेल या एक अष्ट पैलू लेखिका होत्या ज्यांनी आपल्या पुस्तकां द्वारे वैद्यकीय ज्ञानाचा प्रसार केला ज्या मुळे नर्सिंगला एक उदात्त प्रतिष्ठामिळवण्यात मदत झाली.
औपचारिक परिचारिका प्रशिक्षणाची स्थापना करण्यात फ्लोरेन्स नाइटिंगेल एक अग्रणी होत्या आणि त्यांच्या हस्ते 1860 मध्ये, लंडन मध्ये नाईटिंगेल स्कूल ऑफ नर्सिंगचे उद्घाटन करण्यात आले.
फ्लोरेन्स नाइटिंगेल (Florence Nightingale) यांनीच व्यावसायिक नर्सिंगची (professional nursing service) ही प्रथा सुरू केली. 1860 मध्ये लंडन मधील सेंट थॉमस हॉस्पिटल मध्ये पहिली धर्म निरपेक्ष नर्सिंग स्कूल अस्तित्वात आली, त्या साठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले होते.
फ्लोरेन्स नाइटिंगेल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांनी आजारी आणि गरजूं साठी केलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी, प्रत्येक वर्षी 12 मे रोजी 'जागतिक परिचारिका दिन मराठी माहिती - International Nurses Day" हा दिन साजरा केला जातो.
या सोबतच सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान, फ्लोरेन्स नाइटिंगेल पदक तिच्या सन्मानार्थ नाव देण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे महत्त्व (Significance of International Nurses Day in Marathi)
नावा प्रमाणेच, हा दिवस परिचारिकांच्या (Nurses) समाजासाठी योगदान आणि परिश्रम यांचे कौतुक करण्यासाठी आहे.
इतर कोणत्याही वर्षाच्या विपरीत, जागतिक परिचारिका दिन या वर्षी नेहमी पेक्षा जास्त महत्त्वाचा आहे, कारण कोरोना व्हायरस या साथीच्या आजाराच्या काळात परिचारिकांच्या योगदाना मुळे.
त्यांनी जग भरातील दश लक्ष आजारी रूग्णांची काळजी घेण्या साठी आपला जीव धोक्यात घातला आणि सेवाभावी भूमिका स्वीकारून कार्य केले आणि वर्तमानात हि करत आहे.
या आघाडीच्या योद्ध्या (Frontline Warriors) यांना अभिवादन करण्याचा आणि त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा "जागतिक परिचारिका दिन" हा दिवस प्रत्येकासाठी एक उत्तम दिवस आहे.
31 जानेवारी 2021 पर्यंत, 59 देशान मध्ये कोविड-19 विरुद्धच्या युद्धात आंतरराष्ट्रीय परिषदेच्या परिचारिकां नुसार 2,710+ परिचारिका शहीद झाल्या आणि 31 डिसेंबर 2020 पर्यंत, 34 देशान मध्ये 1.6 दशलक्षा हून अधिक आरोग्य सेवा कर्मचार्यांना COVID-19 ची लागण झाली याची नोंद आहे.
भारतात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन कसा साजरा करतात (How does India celebrate International Nurses’ Day in Marathi)
जागतिक परिचारिका दिना निमित्त 35 नर्सिंग व्यावसायिकांना भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार (National Florence Nightingale Award) याने गौरविण्यात येते.
आरोग्य मंत्रालयाने 1973 मध्ये परिचारिकांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची नोंद करण्यासाठी आणि त्यांना ओळखण्यासाठी या पुरस्कारांची स्थापना केली होती.
परिचारिका दिन साजरा करण्यामागील उद्दिष्ट्ये काय आहे? (What is the purpose behind celebrating Nurses Day in Marathi)
- जग भरातील परिचारिकांना प्रशिक्षित केले पाहिजे. त्यांना आरोग्य क्षेत्रातील गरजा आणि आवश्यकतां बद्दल मार्गदर्शन आणि अद्ययावत ज्ञान प्रदान केले पाहिजे जेणे करून त्या वाढत्या तंत्रज्ञानाच्या विश्वात मागे राहता कामा नए.
- आरोग्य क्षेत्रासाठी अपरिहार्य असल्या मुळे परिचारिकांना आजारी पानांसह चांगली कामाची परिस्थिती, मानसिक आरोग्य समर्थन आणि इतर सहाय्य प्रदान केले जावे.
- पुरेशी आर्थिक मदत आणि त्यांना आवश्यक संसाधनांचा वेळे वर पुरवठा व्हावा, याची काळजी घेतली पाहिजे.
- आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना (Health care workers) यांना योग्य आदरानेवागवणूक दिली पाहिजे.
जागतिक परिचारिका दिन साजरा करण्याचे मार्ग कोणते कोणते आहेत? (Ways of International Nurses celebration in Marathi)
- परिचारिकांना भेट वस्तू आणि पुरस्कार दिले जातात. गुलाबाचे फुल देऊन आपल्या भावना व्यक्त करतात.
- अनेक रुग्ण शुभेच्छा चे ई-कार्ड किंवा व्हाट्सएप्प वर मॅसेज पाठवून आपले प्रेम दाखवतात.
- लोकांना प्रशिक्षित आणि शिक्षित करण्यासाठी आभासी वेबिनार आयोजित केले जातात.
- आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषद शैक्षणिक आणि सार्वजनिक माहिती सामग्री असलेली आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन किट वितरीत करतात.
आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण काय करू शकतो? (What can we do to express our gratitude in Marathi)
गेल्या 2 वर्षां पासून, महामारीशी लढण्यासाठी परिचारिकांनी बजावलेली भूमिका अतुलनीय आहे. अग्र भागी कामगार (frontline workers) म्हणून, त्यांनी जग भरातील रूग्णांसाठी जे केले ते अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे.
परिचारिका यांच्या कठोर परिश्रम आणि श्रमाचे कौतुक करण्यासाठी कोणतीही प्रशंसा कधीही पुरेशी असू शकत नाही. या मागच्या वर्षी, आणि वर्तमानात सुद्धा कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यांच्या वरील सतत वाढत जाणारा भार कमी करण्यासाठी सर्व खबरदारी घेऊन आपण आपलं काम केलं पाहिजे.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आपण सर्व जणे मिळून परिचारकांसाठी अशा गोष्टी करू शकतो:
- प्रत्येक वेळी बाहेर पडताना किंवा कोणाशी ही संवाद साधताना डबल मास्क किंवा N95 मास्क घालने.
- अत्यंत आवश्यक असल्या वरच आप घरा बाहेर पडणे, शिवाय घरातच रहा
- प्रत्येक व्यक्ती पासून 6 फूट अंतर ठेवने
- आपले हात नियमित पणे धुवत राहणे.
- बाहेर असल्यास वारंवार आपले हात स्वच्छ करने आणि आपल्या सोबत सॅनिटायझर ची बाटली ठेवने
- पात्र असल्यास प्लाझ्मा दान करने
- जर आपल्या मध्ये कोविड-19 ची लक्षणे आढळल्यास स्वतःस क्वारंटाईन करा आणि आपले SPO2, नाडी आणि शरीराचे तापमान चेक करने
- आणि सर्वात महत्वाचे म्हणे आपण स्वत:च, स्वतः ची औषधोपचार करू नये.
- जर अति ताप असेल तर, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व वेळे वर कारवाई करावी.
निष्कर्ष (Conclusion):-
12 मे (12 May) हा दिवस फ्लॉरेन्स नाइटिंगेलची जयंती म्हणून "जागतिक परिचारिका दिन मराठी माहिती - International Nurses Day in Marathi" साजरा केला जातो.
हा दिन साजरा करण्यामागचे उद्देश, जग भरातील परिचारिकांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, त्यांच्या प्रचंड मेहनती साठी आणि आरोग्य सेवा सातत्य पूर्ण योगदानासाठी त्यांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
✡️ हे पण वाचा >
🆕 सावित्रीबाई फुले निबंध व शुभेच्छा
🆕 सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त निबंध भाषण व शुभेच्छा